कामठी महिला अर्बन परिवाराने नेहमीच सामाजिक नाते अधिकाधिक दृढ़ करण्याचा प्रयत्न केला आहे आणी यापुढेही हे कार्य अखंडपणे सुरु राहिल.
आई महालक्ष्मीच्या आशीर्वादाने, आपल्या विश्वास व सहकार्यामुळे कामठी महिला अर्बन संस्थेने बँकिंग क्षेत्रात आपला शिक्कामोर्तब प्रस्तापित केले आहे. याबद्दल आपले मनापासून धन्यवाद.
नागपुर जिल्ह्यातील नाही तर विदर्भातील अग्रगण्य संस्था म्हणून आज कामठी महिला अर्बननेच नावलौकिक मिळवलेला आहे. तो केवळ आपल्या सर्वांच्या संस्थेवर असणार्या विश्वास व प्रेमामुळे आपल्या आर्थिक समस्या चुटकीसरशी सोडवण्यासाठी अनेक सहज,सुलभ,सरळ अश्या नाविन्यपूर्ण ठेव व कर्ज योजना आणि अत्याधुनिक मोबाइल बँकिंग प्रणाली QR कोड,साऊंडबॉक्स तसेच दररोजच्या जीवनातील यूटिलिटि बिल्स आपल्याला सेवा देण्यासाठी 24तास,365 दिवस आमच्याकडे उपलब्ध आहेत.
आपल जीवन अधिक सुखकर आणि समृद्ध करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत आम्हाला आपली आपल्या कष्टाची आणि आपल्या घामाची जाणीव आहे.
आपल्या उज्वल भविष्याच्या वाटचालीत आमचाही खारीचा वाटा असावा हीच संस्थेची प्रामाणिक अपेक्षा.
सर्वांना मनापासून धन्यवाद.